नाशिक : गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या हत्येनंतर आता नाशिकचे गोल्डमॅन पंकज पारिख हे देखील चर्चेत आले आहेत. पंकज पारिख यांचाही ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट आहे. पारिख यांनी फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेक करत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद केली होती.


नाशिकमधील येवला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि उपमहापौर असलेले पारिख हे व्यावसायिक आहेत. त्यांनी १० किलोचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला आहे. पारिख हा शर्ट घालतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी सहा बॉडीगार्ड असतात. या शर्टचे डिझाईन त्यांनी दुबईतून बनवून घेतले असून नाशिकच्या बाफना सराफांनी तो बनवला आहे. त्यासाठी १९ कारागिर दोन महिने काम करत होते. या शर्टबरोबरच पारिख सोन्याच्या भल्या जाडजूड चेन्स, सोन्याचे घड्याळ, सोन्याची