नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. नाशिकमध्ये मात्र तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून  नागरिकांना  गंडा  घालणाऱ्या महाभागाला पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान कार्यालयात कामाला असल्याचे त्याने सोशल मिडीयावर जाहीर करून टाकले होते. अभिजित विजय पानसरे अस त्याच नाव आहे. फेसबुक  व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो स्वताचा प्रचार करीत असे.  


खाकी वर्दी, मेडल असलेले फोटो तो सोशल मिडीयावर पोस्ट करयचा. सोशल मिडीयाचा खुबीने वापर करीत असल्याने नागरिकांनाही तो आयपीएस अधिकारी असल्याचा भासवत होता. त्याची बनवेगिरी उघडकीस असल्याने नाशिकरोड पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 


सहा महिन्यापूर्वी नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बनावट कागदपत्रे सादर करूंन सुरक्षेचेकडे भेदून लष्करात प्रवेश करणाऱ्या तोतया जवानांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर थेट पंतप्रधान कार्यालयात कामाला असल्याचे सांगून तोतयागिरी करणाऱ्याला अटक झाल्याने सुरक्षेचे गंभीर प्रश्न समोर आलेत.