ठाणे : ठाण्यातील कोपरी येथील एकेकाळचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी टिकमानी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीतून सेनेत उडी मारली होती.


नुकताच केला होता सेनेत प्रवेश

परंतु, टिकमानी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत मात्र कार्यकर्ते नाराज होते. त्यातच, युती तुटल्यामुळे इच्छुक उमेदवार असलेल्या टिकमानी यांनी भाजपाचा रस्ता धरल्याचं सांगण्यात येतंय. 


सोमवारी, विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील, राज्य मंत्री रविंद्र चव्हाण, शहर अध्यक्ष अॅड. संदिप लेले व आमदार संजयजी केळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.