पुणेकरांनो राष्ट्रवादीने दिला आपला जाहीरनामा
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.
पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रवादीनं पुणेकरांना काय आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत.
जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
1 . पुणे देशातील पहिलं डीजिटल शहर करणार.
2. शहरात सार्वजनिक वाहतुकीचा वापर 25 टक्क्यांवर नेणार.
3. पुढील पाच वर्षांत एक लाख परवडणारी घरं बांधणार.
4. वार्डातील कचरा वार्डातच जिरवणार .
5. चोवीस चोवीस तास पाणी देणार .
6. दहा लाख रोजगार निर्माण करणार .
मागील पाच वर्षात राष्ट्रवादीनं पुण्यात कोणती विकास कामं केलीयेत ते पाहुयात
१. शहरात २२० किलोमीटरचे काँक्रीटचे रस्ते केले. त्यामुळं पावसाळ्यात खड्डडे पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी.
२. उड्डाणपुलांचं जाळं पुण्यात तयार केलय. उदा. संचेती हॉस्पिटल उड्डाण पूल, हडपसर, स्वारगेट आणि धनकवडी येथील उड्डाण पूल.
३. बीआरटीचे नवीन दोन मार्ग कार्यान्वीत.
४. पुण्यातील उद्यानांची संख्या ११० वरून १९८ वर.
५. शहरात १५ नवीन दवाखाने महापालिकेनं सुरु केले.
६. सात नवीन सांस्कृतिक सभागृह उभारली.