पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची वर्णी लागली. पण भाजपला फायदा करण्याऐवजी आयुक्तांनी भाजपची कोंडी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस शवदाहिनी आणि मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादीवर आरोप करत भाजपने आंदोलने केले. मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिल्याचा दावा भाजपने केला. पण या दाव्यातली हवाच आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काढली. 


मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला अशा कोणत्याची चौकशीचे आदेश मिळाले नसल्याचे आयुक्त यांनी सांगितले. कॅमेऱ्यासमोर त्यांनी ही माहिती दिली नसली तरी त्यांनी सर्व पत्रकारांना ही माहिती दिली. त्यामुळे भाजप तोंडघशी पडले आहे. आयुक्तांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे.


आयुक्त दिनेश वाघमारे यांची नवी मुंबईतून पिंपरी चिंचवडमध्ये बदली झाली. तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीपूर्वी पंचाईत करायची, अशी चर्चा होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे आदेश मिळाले नसल्याचं सांगितल्याने त्यांनी भाजपलाच तोंडघशी पाडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आयुक्त आणि भाजप यांच्यातला वाद वाढण्याची चिन्हे आहेत.