मुंबई : राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्रथमच काही जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या मित्रपक्षांना खूष करण्यासाठी सहपालकमंत्रीपद दिले असले तरी या दोन्ही सहपालकमंत्री शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्ल्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळं शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच एका जिल्ह्यात अशा पद्धतीने दोन सत्ताकेंद्र नियुक्त केली गेली असल्याने आधीच सरकारमध्ये असलेला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री दीपक सांवत यांच्याबद्दल तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांच्याजागी दिवाकर रावतेंची नियुक्ती कऱण्यात आली आहे. मात्र दीपक सावंतांना दुस-या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. 


हे आहेत नवे पालकमंत्री


दिवाकर रावते- पालकमंत्री, उस्मानाबाद


महादेव जानकर- सहपालकमंत्री, उस्मानाबाद


गुलाबराव पाटील- पालकमंत्री, परभणी


चंद्रकांत पाटील- पालकमंत्री, जळगाव


मदन येरावार- पालकमंत्री, यवतमाळ


संजय राठोड- सहपालकमंत्री, यवतमाळ


अर्जुन खोतकर- पालकमंत्री, नांदेड


सुभाष देशमुख : पालकमंत्री, सांगली


सदाभाऊ खोत : सहपालकमंत्री, सातारा