नाशिक : नवीन आलेल्या पाचशेच्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. याचा कागद देशांतगर्त तयार करण्यात आला असून, शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे. यापूर्वी कागद हा आयात केला जात असे. 


'मेक इन इंडिया' या कार्यक्रमतर्गत होशंगाबाद येथे कागदनिर्मिती सुरु करण्यात आली आहे. नोटा छपाईचा खर्च कमी झाला आहे. सरकारने दोन्ही पद्धतीने बचत करण्याचा प्रयत्न करत 'मेक इन इंडिया' मोहीमेला चालना दिली आहे.