नाशिक : जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. जिल्ह्यातला पारा १० अंशांच्या खाली घसरलाय. निफाडमध्ये तापमान ९ अशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून ११ ते १३ अशांच्या दरम्यान असणारं तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळाजाचा ठोका चुकायला सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गव्हाच्या पिकाला मात्र या थंडीचा फायदा होणार आहे, तर या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम जाणवला. उबदार कपडे खरेदी करण्याकडे नाशिककरांची धावपळ सुरू झाली आहे.


द्राक्षांची पंढरी असलेल्या निफाड तालुक्यामध्ये गेल्या ४,५ दिवसात थंडीचे प्रमाण वाढले आहे. तापमानातील ही घट अशीच राहीली तर नगदी पिक असलेल्या द्राक्षाच्या फुगवणीवर याचा परिणाम होणार असून निर्यातक्षम मालाची प्रतसुध्दा खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे.