नागपूर: 26 जानेवारी 2018 ला नागपूरात मेट्रोचं उद्घाटन करण्याचं टार्गेट निश्चित केलं असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. नागपुरात गडकरींचा मीट द प्रेस हा विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी नागपूरच्या विकासासाठी तब्बल 20 हजार कोटींची कामं आखण्यात आल्याचंही गडकरींनी सांगितलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात दोन लाख किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं. त्याचप्रमाणे येत्या महिन्याभरात नागपूरच्या रस्त्यावर इथेनॉलवर चालणाऱ्या 50 बसेस धावतील अशी माहितीही गडकरींनी दिली. नागपुरात जेनेरिक औषधांचं दुकान सुरू करण्याचं उदिष्ट असल्याची प्रतिक्रिया गडकरींनी दिली आहे. 


याशिवाय राज्यसरकारनं परवानगी दिल्यावर मुंबई,पुणे आणि नागपूर सोडून इतर शहरांमध्ये ई रिक्षा रस्तावर सुरू करण्यात येतील असंही गडकरींनी स्पष्ट केलं.