औरंगाबाद : आरोपांनंतर खडसेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागू शकतं, अशी जोरदार चर्चा सुरू असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडसेंवर कारवाई होणारच नाही, असा विश्वासच दानवेंनी व्यक्त केलाय. एकनाथ खडसे दोषी नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही, असं दानवेंनी म्हटलंय. प्रकरणं न्यायालयात आहेत... तिथं आरोप सिद्ध झाले तर त्याप्रमाणे कारवाई होईलच... परंतु, तोपर्यंत पक्षांतर्गत कोणतीही कारवाई खडसेंवर केली जाणार नाही, असं दानवेंनी म्हटलंय. 


मुख्यमंत्र्यांनी सोपवला अहवाल


खडसे वादात अडकल्यानंतर त्यांच्याबद्दल निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वानं अहवाल मागवलाय... पण, हा अहवाल त्यांच्या विरोधात असेलच असं नाही, असं सूचक वक्तव्यही दानवेंनी केलंय. महत्त्ताचं म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपवलाय.