अमरावती : मूळची अमरावती जिल्ह्यातील असलेली माधुरी सोळंके मुंबई पोलिसात होती, तिचा बेवारस मृतदेह आढळून आला आणि बेवारस म्हणून पोस्टमॉर्टम देखील आटोपण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 


तक्रार स्वीकारली नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मृतदेह मिळण्याच्या २ दिवस आधी माधुरीची बहिण रेश्माने वरळी पोलिस स्टेशनला बहिण घरी परतली नसल्याची लेखी तक्रार दिली होती, मात्र ती तक्रार स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप तिच्या बहिणीने केला आहे.


महिला पोलिसाला न्याय नाही, इतरांचं काय?


माधुरी एक पोलिस शिपाई होती, तिची हत्या झाल्याचा संशय आहे, आणि पोलिस हेच प्रकरण दड़पण्याचा प्रयत्न करत असतील, तर सर्व सामान्यांचं काय?


वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली कुमारी माधुरी सोळंके १४-८-१६ रोजी आपल्या कर्तव्यावरून घरी परत न आलेली नाही. याबद्दल तिच्या लहान बहिणीने वरळी पोलीस ठाण्यात विचारणा केली.


बहिणीकडून तक्रार घेतली नाही


मात्र सामान्य नागरिकांचं सोडवा, माधुरी सोळंकेलाही पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन घरी परतवून लावण्यात आले. विशेष म्हणजे याविषयी तिची लेखी तक्रार सुद्धा घेण्यात आली नाही.


बेवारस मृतदेह म्हणून पोस्टमॉर्टम आटोपलं


मात्र दोन दिवसानंतर माधुरी सोळंकेचा कळवा ते ठाणे दरम्यान तिचा मृतदेह आढळून आला होता, या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद घेऊन, मृतदेह बेवारस असल्याची नोंद घेऊन पोस्टमार्टम आटपून घेण्यात आले होते.


चौकशीची आई आणि बहिणीची मागणी


माधुरीच्या बहिणीची तक्रार न घेता, बेवारस मृतदेह असल्याचं दाखवून कुणालाही न कळू देता पोस्टमार्टम करून घेणे, या सर्व बाबी संशयाद्स्पद असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मृत महिला पोलीस माधुरी सोळंके हिच्या आईने आणि बहिणीने केली आहे.


तो छळ करत होता, असा आरोप


याच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुरेश माळी हा तिचा छळ करायचा, असा आरोप या माधुरी सोळंके हिच्या कुटुंबीयांनी केला आहे?


अमरावतीच्या मुलीला न्याय मिळेल का?


मृत माधुरी सोळंके ही अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील भालसी या गावाची राहणारी होती, आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन तिच्या कुटुंबीयांनी दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सरकारला दिले आहे, तर सरकारचे पोलीस विभागावर नियंत्रण नाही, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांनी केले आहेत.