ठाणे : ठाण्यात पेशाने चार्टड अकाउंटट असलेल्या एका तरुणाने १४ जणांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली. याप्रकरणी हत्या करणाऱ्या हसनेनच्या बहिणीचं विधान समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे भांडण झाले नव्हते असे त्याच्या बहिणीने म्हटलंय. या हत्याकांडात हसनेनची केवळ एक बहिण जिवंत राहिलीये. घटना उघडकीस आल्यानंतर जखमी अवस्थेत तिला बाहेर काढण्यात आलं. तिच्या शरीरावरही धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. 


शनिवारी रात्री घरात पार्टीदरम्यान कोणांमध्येही वाद झाला नव्हता, असे हसनेनच्या बहिणीने सांगितलं. घटनेनंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हसनेनच्या बहिणीची भेट घेऊन तिची विचारपूस केली. 


वारेकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. तसेच हसनेनचीही वागणूक चांगली होती असे शेजाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र त्यानंतरही हसनेने हे निघृण कृत्य का केलं याचा पोलीस शोध घेत आहेत.