धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांकडे पावसाची पाठ
राज्यात सर्वत्र पावसानं कृपा दाखवली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यावर पाऊस रुसला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही.
नंदुरबार : राज्यात सर्वत्र पावसानं कृपा दाखवली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यावर पाऊस रुसला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही.
अनके महसूल मंडळांत पावसानं ५० टक्क्यांची सरासरीही गाठलेली नाही. महत्त्वाच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसानं पाठ फिरवल्यानं, शेतकरी हवालदिल झाला.
शेतीत काम मिळत नसल्यानं मजुरांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. त्यामुळे शेतीची कामं मिळत नसल्यानं मजुरांवर स्थलांतराची वेळ आलीय. आठवड्यातले काही दिवसही काम मिळत नसल्यानं, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसानं तडाखा दिल्यानं, मजूर अधिकच अडचणीत सापडलेत.
आपल्याकडच्या कोंबड्या, बोकड स्वस्तात विकून कशीबशी गुजराण केली जात आहे. मात्र शेतात कामच मिळत नसल्यानं ग्रामीण भागात मजुरांमुळे चालणारी छोटी अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून पडली आहे.