मुंबई : टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी रोखण्याच्या दृष्टीने टोलनाक्याजवळ असणा-या पिवळ्या रांगेच्या बाहेरपर्यंत वाहनं गेल्यास टोल न घेता सोडावीत असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वाहनं सोडून दिल्यामुळं तिथं गर्दी कमी होण्यास मदत होईल असं वक्तव्य शिंदेंनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या लक्षवेधी सूचनेला शिंदे यांनी उत्तर दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांची अंमलबजावणी होण्याकरता आदेश देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.


मुंबई एंट्री पॉइंट आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या टोल बंद करण्याबाबत संदर्भात सरकार लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली आहे.