बँकेत पैसे काढताना रांगेत चक्कर, ज्येष्ठाचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिर्डी इथले ज्येष्ठ नागरिक अय्युब बेग रशीद बेग यांचं निंभोरा इथल्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना रांगेत उभे राहिल्याने चक्कर आल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिर्डी इथले ज्येष्ठ नागरिक अय्युब बेग रशीद बेग यांचं निंभोरा इथल्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना रांगेत उभे राहिल्याने चक्कर आल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुलगा अनीश बेग हा सोबत असल्यामुळे त्याने त्यांना पाणी पाजून निंभोरा इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचासाठी त्यांना सावदा इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान १० ते १५ मिनिटांत अय्युब बेग यांचे निधन झाले.