नाशिक : उमेदवार अर्ज छाननीत शिवसेनच्या पँनलला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 30मधील शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या एबी फॉर्मला निवडणूक अधिका-यांनी हरकत घेतली आहे. उमेदवारांच्या एबी फॉर्मवर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी काळ्या रंगात स्वाक्षरी केल्यानं ही हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचं संपूर्ण पॅनलच अपक्ष ठरण्याची शक्यता आहे.


स्वाक्षरीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी या उमेदवारांना सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तीनच दिवसापूर्वी शिवसेनेत दाखल झालेले अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण, यांच्यासह अपक्ष नगरसेविका रशिदा शेख, शकुंतला खोडे, निलेश चव्हाण यांच्या अधिकृत उमेदवारीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.