धुळे : धुळे शहरात एका तरुणीला डेंग्यूने आपला जीव गमवावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजूनही शहरात डेंग्यूचे अनेक रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिरपूर शहरातही डेंग्यूची दहशत अद्याप संपलेली नाही. शिरपूरमध्ये मागच्या आठवड्यात दोन मुलांना आपला जीव डेंग्यूसदृश्य आजारानं गमवावा लागला होता.


या दोन्ही शहरातील पालिका अधिकारी मात्र या गंभीर समस्येकडे पाहायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधी तक्रार करून थकले आहेत मात्र अधिकारी ढीम्म आहेत. 


कार्तिक माळी आणि हर्षल माळी या एकाच वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलांचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला. डेंग्यूचं थैमान आणि आरोग्य विभागाचा गलथान कारभार यामुळे जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक चांगलेच वैतागलेत.


शिर्डीतही डेंग्युचा फैलाव


साईबाबांच्या शिर्डीतही डेंगू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून, गेल्या १५ दिवसांत डेंगूच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला. पंचायतीच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी आंदोलकांनी चांगलेच खडे बोल सुनावले.