नाशिक : शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ रुपये क्विंटलचा नीचांकी भाव मिळल्यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसने कांद्याला २००० रुपये हमीभाव मिळाला यासाठी आंदोलन केले. 


या आंदोलनात येवल्यात तहसील कार्यालयावर कांदा फेक आंदोलन केले. कांद्याला दिले जाणारे भाव हे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहेत. शासनाने तातडीने बाजार हस्तक्षेप करीत नाफेडमार्फत कांदा खरेदी तात्काळ सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.