महेश पोतदार, झी मीडिया उस्मानाबाद :  इंटरनेटच्या साह्याने,ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक उत्पादने ग्राहकांना थेट विकण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. पण आता ग्रामीण भागीतील ‘कोबंडी आणि अंड्या’ सारख्या वस्तूंची विक्री सुद्धा,  इंटरनेट वरून, शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरी भागातही करतायेऊ शकते.याचा यशस्वी प्रयोग उस्मानाबादच्या एका युवकाने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ जातीच्या काळ्या रंगाच्या कोंबड्या आणि अंड्याची विक्री करून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणांने, लाखो रुपये कमावण्याचा मार्ग ग्रामीण भागीतील तरुणांना दाखवला आहे.   


गुणधर्म असलेल्या कोंबड्या 


हल्ली सगळंच ऑनलाईन विकत मिळतं आणि विकलं जातं... मात्र अद्याप कोंबड्या आणि त्यांची अंडी ऑनलाईन विक्रीला आल्याचं ऐकिवात नव्हतं... मात्र उस्मानाबाद शहरातल्या एका तरुणानं आता कोंबड्यांची ऑनलाईन विक्री सुरू केलीये. अजिंठा नगर भागात राहणाऱ्या सिद्धार्थ बनसोडे या युवकानं घराजवळच्या मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळल्या... अवघ्या ३५ हजार रुपयाच्या गुंतवणूकीत ४ महिन्यात 1 लाख 20 हजार रुपयांचा नफा झाला. प्रशिक्षण, नियोजन आणि मार्केटिंगसाठी सिद्धार्थनं नवीन तंत्रज्ञानाचा कल्पकतेनं वापर केलाय. 


कडकनाथ जातीची काळी कोंबडीची १०५ पिल्लं आणून हा व्यवसाय सुरु केला. औषधी गुणधर्म असलेली या कोंबडीच्या मांस आणि अंड्याला मोठी मागणी आहे.


कडकनाथ कोंबड्याची वैशिष्ट्ये


कडकनाथ जातीच्या कोंबड्या या सामान्य कोंबड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. या काळ्या रंगाच्या असतात. त्यांची चोच, पाय, अगदी हाडंही काळी असतात. त्यांच्या रक्ताचा रंगही कळपट लाल असतो. कडकनाथ कोंबडीची अंडी आणि मांस यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे याला मोठी मागणी असते, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी-जिल्हा परिषद डॉ.शितलकुमार मुकणे-   


कुठे आढळते ही कोंबडी 


कडकनाथ जातीची काळी कोंबडी ही झारखंड मधील झान्बुवा जिल्ह्यात आढळते, रोग प्रतिकारशक्ती जास्त, प्रोटीन, औषधी गुणधर्म असलेली या कोंबडीच्या मांस आणि अंड्याला मोठी मागणी आहे.


OLX वर विक्री...


हे लक्षात आल्यावर सिद्धार्थनं माहिती महाजालाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या व्यवसायाची माहिती olx या संकेतस्थळावर टाकली. कोबड्यांचे फोटो, व्हिडीओ त्यानं अपलोड केले. याचा खूप मोठा फायदा झाला. कोंबड्या आणि अंड्यांना मागणी यायला सुरवात झाली.   


 
ग्राहक खूश...


 मी इन्टरनेट वरून या जातीच्या कोंबडीची माहिती मिळाली,बनसोडे यांच्या कडे या कोंबड्या असल्याच olx वरून समजल. म्हणून विकत घ्यायला आलोय, ओरिजिनल मिळतात म्हणून आलो, गुणकारी, किमत जास्त येते, याची प्रेरणा घेवून मीही माझ्या शेतात हा व्यवसाय करणार असल्याचे ग्राहक मंगेश देशमुख यांनी सांगितले. 


एकदम कडक          


दुष्काळ आणि बेरोजगारी याचं भांडवल न करता हाती असलेली साधनं वापरून काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण सिद्धार्थ बनसोडेनं घालून दिलंय... एकदम कडक..