नाशिक : शेतकरी कर्जमाफीसाठी निघलेल्या संघर्ष यात्रेतील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव फार्महाऊसवर भेट घेतली. अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी हि भेट घेतली. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं खडसेंनी सांगितलं.


संघर्ष यात्रेनिमित्त विरोधक फडणवीस सरकारला अडचणीत आणत असताना विरोधकांनी घेतलेल्या खडसेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आलाय. खडसे सध्या भाजपमध्ये एकाकी पडले असताना हि या भेटीची चर्चा रंगली आहे.