मुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी
उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे
मुंबई : उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत सरकारच्या धोरणांवर टीका केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे.
राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था, मराठा आरक्षण अश्या अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनिती विरोधकांनी आखलीय. राज्यातील सरकार स्थिर आहे की अस्थिर आहे याबाबत चित्र समोर आलं पाहीजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणावा असा आग्रही विरोधकांनी धरला.