उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, तसंच या घटनेचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यानं करावा अशी मागणी पवारांनी केली आहे. शरद पवारांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यामध्ये महिलांवर वाढत चाललेले अत्याचार ही चिंतेची गोष्ट आहे, असं पवार म्हणाले आहेत. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून पवारांनी राज्य सरकारवरही टीका केली आहे. गृहखात्यावर निगराणी ठेवणाऱ्या व्यक्तीची महाराष्ट्राला गरज आहे, असं पवार म्हणाले आहेत.