पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. सध्या भाजपची हवा असली तरी आमच्या डोक्यात हवा गेलेली नाही, असेही ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वबळावर लढल्यास जागा वाढतील, मात्र बहुमत मिळणार नाही अशी कबुलीच त्यांनी दिलीये. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेसोबत युती व्हावीसाठी मनापासून म्हणून प्रयत्न करणार असल्याचं बापट म्हणाले. 


तर पक्षात प्रवेश देण्यात आलेला मुळशीमधला गुंड विठ्ठल शेलारबाबत झालेली चूक दुरूस्त करू, असंही त्यांनी म्हटले आहे.