मुंबई : राज्य सरकारला आमचा पाठिंबा आहे, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही मुद्द्यांवर आमचे मतभेद आहेत ते आम्ही लपवत नाही. आम्ही गुण्या गोविंदानं नांदत आहोत, तुम्हाला का प्रॉब्लेम आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. यानंतर भाजपनं मुंबई महापालिकेमध्ये महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या या निर्णयामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर व्हायचा मार्ग मोकळा झाला.


भाजपच्या या भूमिकेनंतर शिवसेनाही थोडी मवाळ झाल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. पण आता मात्र आम्ही खिशातले राजीनामे बाजूला काढून ठेवले आहेत, असं वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे.