लातूर दौऱ्यातील पंकजा मुंडेंचा सेल्फी वादात
राज्याच्या महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. लातूर दौऱ्यादरम्यान पंकजा यांनी काढलेल्या सेल्फीवरुन विरोधकांची त्यांच्यावर जोरदार टीका होतेय.
लातूर : राज्याच्या महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. लातूर दौऱ्यादरम्यान पंकजा यांनी काढलेल्या सेल्फीवरुन विरोधकांची त्यांच्यावर जोरदार टीका होतेय.
जल योजना तसचे सरकारी कामांची पहाणी करण्यासाठी पंकजा मुंडे लातूरच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. यादौऱ्यादरम्यान त्यांना तेथे सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर त्यांनी हे सेल्फी ट्विटरवरुन शेअरही केले.
या फोटोंवरुन विरोधी पक्ष नेत्यांनी पंकजा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. दुष्काळग्रस्त भागांमध्ये दौऱ्याच्या नावाने मंत्री फिरत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.
यापूर्वी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा लातूर दौराही वादात सापडला होता. पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या लातूरमध्ये खडसेंच्या दौऱ्यासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत होती.