पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही
भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.
बीड : भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. गडाच्या आतमध्ये दसरा मेळाव्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली आहे.
गडाच्या हद्दीत ४० गुंठे जागा भारजवाडी ग्रामपंचायतची असून तिथं दसरा मेळाव्याला परवानगी मागण्यात आली होती. ग्रामपंचायतनं सहा तारखेला जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता, पण त्या जागेत परवानगी नाकारण्यात आली आहे.
तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भगवानगडावर जमावबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. त्यामुळं पंकजा मुंडे यांना झटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांनीच हा दणका दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.