पुणे : खासगी शाळांकडून अवैधरित्या फी वाढ करण्यात आली असून ती शुल्कवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात विभागीय उपसंचालकांना पालकांनी घेराव घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी उपसंचालक दिनकर टेनकर यांच्या कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधातही जोरदार घोषणा देण्यात आल्या. 


अवैध शुल्क वसुली करणा-या शाळांवर सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी पालकांनी केलाय. ही शुल्कवाढ रद्द होत नाही तोवर हलणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतलीय. खासगी शाळांच्या मनमानी विरोधात पुण्यातील 19 शाळांचे पालक एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.