पुणे : मोदी सरकारनं शेतमालाच्या आयातीला निर्बंध घालावेत अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलीय. देशात धान्याचं मुबलक उत्पादन होत असल्यानं आयातीला प्रोत्साहन देण्याऐवजी निर्यातीला सवलत देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळायला हवा असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात डाळिंब उत्पादक संघाच्या वतीनं डाळिंब परिषदेचं आयोजन करण्यात आलय. त्यानिमित्ताने पवार यांनी शेती संबंधीच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजनांचा उहापोह केला. तसंच महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांच्या डाळिंबाना जगाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी पवारांनी दिलीय. 


पाहा काय म्हणाले शरद पवार