कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड  : शहरामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं या साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेन ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. दाम्पत्यान एका मुलीवर शस्त्रक्रीया केली तर महापालिकेकडून दाम्पत्याला २५ हजार रुपये दिले जाणार आहेत...दाम्पत्यांना दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली तर महापालिका १० हजार रुपये देणार आहे...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवड शहरात एक हजार पुरुषामाग ९२३ स्त्रिया असं प्रमाण आहे. मुलींचे घटत प्रमाण कमी करण्यासाठी आणि मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याचे ठरवलंय ....त्याचाच एक भाग म्हणून शहरात दाम्पत्यानं एका मुलीवर शस्त्रक्रिया केली तर दाम्पत्याला २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय.


दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली तर महापालिका दाम्पत्याला १० हजार रुपये देणार आहे.. असा निर्णय घेणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकमेव असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय...या निर्णयावर आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.


महापालिकेतल्या स्थायीच्या कारभारावर कायम टीका करणाऱ्या भाजपने ही या निर्णयाचं स्वागत केलंय...! नागरिकांनी ही या निर्णयाचे स्वागत केलंय..! 


लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी मुलींच्या वाढीचे प्रमाण मात्र कमीच आहे..अश्या स्तिथीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने टाकलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे..मुलींचं प्रमाण वाढण्यासाठी हा अंतिम उपाय नसला तरी महापालिकेने सुरुवात केलीय हे ही नसे थोडके...!