जळगाव : महापालिकेच्या आजी माजी महापौर तसंच नगरसेवकांकडून थकलेले 60 कोटी त्वरीत वसूल करावे आणि या पैश्यातून जळगाव शहराचा ठप्प झालेला विकास करावा अशी मागणी जिल्हा जागृत मंचाने केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थकबाकीदार लोकप्रतिनिधींचा फलकच लावल्याने अनेकांचं लक्ष या गंभीर बाबीकडे वेधलं गेलंय. निवृत्त कर्मचारी अनिल नाटेकर यांना निवृत्तीचे पैसे मिळाले नसल्याने, जागृत मंचासोबत त्यांनी महापालिकेसमोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. 


जळगाव महापालिकेनं कोट्यवधीचं कर्ज घरकुल योजना, रस्ते, विमानतळ यासाठी काढलं होतं. मात्र या योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्यानं ती विकासकामं अर्धवटच राहिली. त्यामुळे जळगावकरांवर कर्जाचा डोंगर कायम आहे.