बुलडाणा : शेतात सुस्तावून पहुडलेला अजगर पहाण्यासाठी झालेल्या गदारोळात, बुलडाण्यातल्या अल्पभूधारक शेतक-याला हकनाक 50 हजारांचा फटका बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर जवळच्या काशिनाथ व्यवहारे यांच्या शेतात अजगर शेतमजूरांना आढळून आला. त्याची माहिती सर्वप्रथम वन विभागाला सकाळी साडे नऊ वाजता दिली गेली. मात्र अनेकवेळा फोनवर संपर्क करुनही, वन विभागाचे कर्मचारी या अजगराला पकडून नेण्यासाठी वेळेत पोहोचू शकले नाहीत. 


दरम्यान, या अवाढव्य अजगराला पाहण्याकरता, परिसरातल्या शेकडो लोकांची काशिनाथ व्यवहारे यांच्या शेतात वर्दळ सुरु झाली. त्यात व्यवहारे यांच्या एक एकर शेतातलं सोयाबिनचं पिक उद्धवस्त झालं. तर तूर पिकही नष्ट झालं. आता सरकार किंवा वन विभाग त्याची नुकसान भरपाई भरुन देणार का, असा सवाल व्यवहारे करताहेत.