अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण
अनैतिक प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना सांगलीमध्ये घडलीय. सांगली जिल्ह्यातल्या किल्ले मच्छिंद्रगड गावातली काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे.
सांगली : अनैतिक प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना सांगलीमध्ये घडलीय. सांगली जिल्ह्यातल्या किल्ले मच्छिंद्रगड गावातली काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे.
महिला आणि पुरुषाचे हातपाय बांधून त्यांना काठीनं बेदम मारहाण केली गेली. गोपाळ समाज जातपंचायतीनं शिक्षा म्हणून त्यांना अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.