नोटांसाठी नागरिकांच्या `बंद` एटीएम सेंटर्सच्या बाहेर रांगा
आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ तारखेला संध्याकाळी केली होती. पण, आत्ता दुपारचे ११ वाजून गेले तरी देशातल्या जवळपास सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेली नाहीत.
मुंबई : आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ तारखेला संध्याकाळी केली होती. पण, आत्ता दुपारचे ११ वाजून गेले तरी देशातल्या जवळपास सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेली नाहीत.
त्यामुळे, बँकांच्या शाखा उघडल्यानंतर आता लोकांची पावलं पुन्हा एकदा एटीएम सेंटर्सकडून बँकांकडे वळली आहेत.
सकाळी १० वाजेपर्यंत एटीएम सुरू होतील, असं सांगण्यात येत होतं. पण तसं झालेलं नाही. अनेक ठिकाणी 'बंद' एटीएमबाहेर लोकांनी रांगा लागलेल्या दिसल्या.
रत्नागिरीत एटीएम सुरू
देशभरात ही परिस्थिती असताना रत्नागिरीत स्टेट बँकेच्या एटीएम सकाळीचं उघडलंय. त्यामुळे रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळालाय. अद्याप एसबीआय व्यतिरिक्त इतर बँकांची एटीएम मात्र रत्नागिरीतही बंदच आहेत.