औरंगाबादमधील पेट्रोल पंप बंद, पालिका कारवाई बडग्यानंतर आंदोलन
शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात हा एक दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे.
औरंगाबाद : शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात हा एक दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे.
गजबलेल्या वस्तीतील पेट्रोल पंपांना महापालिकेची नोटीस बजावली आहे. पेट्रोल पंप बंद करण्याची ही नोटीस आहे. त्यामुळे नाराज पेट्रोल पंप चालकांनी आंदोलनाचे हत्यात उपसले आहे.
महापालिकेने कारवाईचा बडगा उगरल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी अचानक बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांचे अधिक हाल झाले आहे. नोटबंदीमुळे हैराण झालेले नागरिक या बंदमुळे नाराज आहे.