सोलापूर : कित्येक वर्षांपासूनची मागणी असलेल्या फलटण ते अकलूज रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली जाणार आहे. पंढरपूर - फलटण रेल्वे संघर्ष समितीनं ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रासपचे अध्यक्ष आणि पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या सोबत अकलूजच्या शिष्टमंडळानं, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची नुकतीच भेट घेतली. पंढरपूर - फलटण रेल्वेमार्ग ब्रिटिशांच्या काळात निर्माण करण्यात आला आहे. 


१०९ किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. फलटण - अकलूज मार्गाबरोबरच मराठवाड्यातल्या आष्टी - जामखेड - ढवळस रेल्वेमार्गासाठी सुद्धा आगामी बजेटमध्ये निधीची तरतूद केली जाणार आहे.