नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिलला नागपुरात येणार आहेत. या भेटीदरम्यान ते तीन ठिकाणी जाणार आहेत.


14 एप्रिलला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते सर्वप्रथम दीक्षाभूमीला जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतील. त्यानंतर कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाला भेट देऊन दोन नव्या संचांच लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर मानकापूरच्या स्टेडियममध्ये डीजी धनचे 100 दिवस जाहीर या कार्यक्रमात संबोधित करतील. यापूर्वी नागपूरच्या मेट्रो भूमीपुजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आले होते. आता अडीच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा ते नागपुरात येतायत. त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य नागपुरकरांमध्येही उत्साह आहे.