नवी मुंबई : चोर समजून पोलिसांनाच बेदम मारहाण झाल्याची घटना नवी मुंबईतल्या उलवे जवळच्या कोंबडभुजे या गावात घडलीय. यात मुंबई स्पेशल ब्रँचचे सात पोलीस जखमी झालेत, तर दोन पोलीस गंभीर जखमी आहेत. या गावात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, यासाठी गावातल्या तरूणांनी गस्तीपथक तयार केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीच्या वेळी हे पथक गावात गस्त घालत असताना मुंबई पोलिसांचं सात जणांचं पथक साध्या पोलिसांच्या वेशात बांग्लादेशी नागरिकांविरोधातल्या कारवाईसाठी गावात गेलं होतं. यात दोन महिला पोलीस कर्मचारीही होते. मात्र पोलिसांना बघून बांगलादेशी पळून गेले आणि ग्रामस्थ पोलिसांनाच चोर समजले.


शेकडो ग्रामस्थ जमा झाले आणि सात पोलिसांना मारहाण झाली. पोलिसांनी आपलं ओळखपत्रही दाखवलं नाही आणि ते पोलिसांच्या वेशातही नव्हते त्यामुळे मारहाण झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.