राज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश
५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यामुळे बॅंकाच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत. सर्व सरकारी बॅंकांना पोलिस सुरक्षा पुरवतील पण खाजगी बॅंकांनी आपली खाजगी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत.
मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यामुळे बॅंकाच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत. सर्व सरकारी बॅंकांना पोलिस सुरक्षा पुरवतील पण खाजगी बॅंकांनी आपली खाजगी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत.
आज आणि उद्या दोन दिवस बॅंका बंद असून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात नवीन नोटा घेण्याकरता नागरीक गर्दी करतील याचाच फायदा घेवून समजाकंटक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील, तसच बॅंकामध्ये चोरीचं आणि दरोड्याचं प्रमाण वाढणार हे लक्षात घेवून त्या दृष्टीने पोलिसांनी सुरक्षेच्या उपाय योजना कराव्यात आणि खाजगी बॅंकांनी आपली सुरक्षा वाढवावी असे निर्देशही सर्व बॅंकाना देण्यात आलेत.