नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांचीच फसवणुकीचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. फसवणूक करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून खुद्द पोलीस कर्मचारीच आहे. पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची रक्कम घेऊन हा पोलीस कर्मचारी पसार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बबलू बागडे असं त्याचं नाव असून शहर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम देण्याच्या नावाखाली फसवलंय. वार्षिक फंडच्या नावाखाली  दर महिन्याला १ हजार पासून १० हजारांपर्यंत पैसे गोळा करीत असे. 


१२ महिने पैसे जमा केल्यावर गोळा रकमेच्या २५ टक्के अधिक रक्कम देत असे. सुरवातीला दोन वर्षे त्याने पैसे न चुकता परत केले मात्र आता ३ महिन्यापासून तो गुंतवणूकदारांना सापडत नाही. पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली तक्रार नोंदवली आहे.