पोलिसांच्या ताब्यातून येरवडा जेलधील आरोपी फरार
पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाले आहेत. येरवडा जेलमधून पारगाव खंडाळा कोर्टात सुनावणीसाठी नेलेले ३ आरोपी पळाले आहेत.
पुणे : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाले आहेत. येरवडा जेलमधून पारगाव खंडाळा कोर्टात सुनावणीसाठी नेलेले ३ आरोपी पळाले आहेत.
काल्या उर्फ राजू पात्रे , संतोष जगताप, लुभ्या चांदिलकर अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत. कोर्ट कामकाज संपल्यानंतर पुण्याकडे परतत असताना कात्रज घाटात लघुशंकेसाठी थांबले असताना आरोपी पसार झाले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या संबधीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या ताब्यातून सोमवारी सांयकाळी ७.३० वाजता हे आरोपी फरार झाले आहेत.