अमरावती : 23 तारखेनंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. अमरावतीत झालेल्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 तारखेला राज्यातल्या महापालिका निवडणुकांचे निकाल येणार आहेत. या निकालानंतर राज्यातलं राजकारण बदलेल असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे.


शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेले वाद पाहता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकार सध्या नोटिस पिरियडवर असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनीच केलं होतं. दरम्यान राज्य सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.