नाशिक : लाखांचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढे जगण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेली तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं खरं. मात्र अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्रंच सुरु झालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत. 


तर द्राक्ष पिकांचे भाव कधी नव्हे इतके घसरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. डाळिंबालाही बाजारात भाव नसल्याचंच दिसून आलंय. परिणामी डाळींब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. 


फळपिकांची अशी दयनीय स्थिती आहे, तर जेवणाला चव देणारा कांदा मात्र शेतकऱ्यांना सततच रडवत असतो. पिक आलंय मात्र त्याला भावच नाही अशी विचीत्र कोडींची परिस्थिती पिकवत्या हातांसमोर निर्माण झाली आहे. 


जेवढा खर्च उत्पादन घेण्यावर केलाय, तेवढा खर्चही निघत नसल्याचा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. त्यामुळे जगायचं कसं हाच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.