कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी
कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई : कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोकण रेल्वेत गाड्या चालवणाऱ्या लोको पायलटना सहाय्य करणारे कर्मचारी म्हणजेच सहाय्यक लोकोपायलटच्या जागा (इथं करा क्लिक) भरण्यासाठी तयारी सुरु केलेय. त्यासाठी कोकण रेल्वेच्या अखत्यारितील महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोव्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह कोकण रेल्वेच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयाकडे 29 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पोहोचतील असे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीच्या माध्यमातून 57 जागा भरण्यात येणार आहे. अधिक माहिती कोकण रेल्वेच्या www.konkanrailway.com या संकेतस्थळावर अर्ज तसेच अधिक माहिती उपलब्ध आहे. कोकण रेल्वे प्रकल्पाच्या हद्दीतील उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.