डोंबिवलीत 10 दिवसांत खड्डे न बुजबल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा
गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आलेला असताना कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. मागील महिनाभरापासून महानगर पालिका क्षेत्रात सर्वच रस्त्यांवर खड्डयांच साम्राज्य असताना प्रशासन आणि सत्ताधारी मात्र थंड बसलेत.
डोंबिवली : गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आलेला असताना कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. मागील महिनाभरापासून महानगर पालिका क्षेत्रात सर्वच रस्त्यांवर खड्डयांच साम्राज्य असताना प्रशासन आणि सत्ताधारी मात्र थंड बसलेत.
विरोधकांनी मात्र आता आक्रमक भूमिका घेतल्याच दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज महानगरपालिकाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केलं.
गणपतीउत्साव तोंडावर आलेला असताना रस्त्यांची दुरावस्था सुधारण्यास अपयशी ठरल्याने या वेळी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. महापालिका कार्यालयाच्या बाहेर प्रतिकात्मक गणेशासमोर आरती करून लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची सुबुद्धी महापालिकेला द्यावी अशी प्रार्थना या वेळी मनसे तर्फे करण्यात आली.
त्यानंतर मनसे पदाधिका-यांनी कार्यकारी अभियंते सुभाष पाटील यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला आणि 10 दिवसांत खड्डे न बुजबल्यास मनसे स्टाईलनं खळ् फट्याक आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी मनसेनं लोकांना खड्ड्यात पाडणाऱ्या प्रशासनाला झंडू बाम भेट दिला.