येवला : कांद्यानं शेतक-यांचा वांदा केलाय.. मात्र ज्या येवल्यात कांद्याचं भरपूर पीक घेतलं जातं त्याच येवल्यात योगेश पाठारे या शेतक-यानं प्रायोगिक तत्वावर आपल्या शेतात बटाट्याची लागवड केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळी कांद्यापेक्षा कमी कालावधीत येणा-या या पीकानं पाठारेंचा मोठा फायदा झालाय. अवघ्या १५ गुंठ्यात त्यांना अतिशय कमी खर्चात ४० क्विंटल बटाट्याचे उत्पन्न घेतलं. 


आपला शेतमाल व्यापा-याच्या हातात न देता योगेशनं आपला माल स्वताच विकला. तोही हायटेक पद्धतीनं. योगेशनं व्हॉट्सअॅपवर आपल्या बटाट्याचं भरपूर मार्केटींग केलं. त्यात त्याला यश आलं. 


व्यापारी ते विक्रेते या साखळीत ग्राहकापर्यंत येईपर्यंत या बटाट्याची किंमत पंधरा रुपये किलोच्या आसपास जाते. मात्र थेट शेतकऱ्याकडून खरेदी करीत असल्याने ग्राहकांना उत्तम प्रतीचा ताजा बटाटा अवघ्या 10 रुपये किलो दरानं मिळाला. शिवाय योगेशलाही यातून चांगलाच फायदा झालाय.