ठाण्यात शिवसेनेत राडा, उमेदवारी मागे घेण्यावरुन धमकी
उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून शिवसेनेचे कार्यकर्त्यांनीपवन कदम या माजी नगरसेवकाला त्याच्याच शिवसेना शाखेत घेराव घातला आहे. अधिकृत उमेवादी मागे घेण्यासाठी दबाबतंत्र सुरु असल्याचे येथे तणावाचे वातावरण आहे.
ठाणे : उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून शिवसेनेचे कार्यकर्त्यांनीपवन कदम या माजी नगरसेवकाला त्याच्याच शिवसेना शाखेत घेराव घातला आहे. अधिकृत उमेवादी मागे घेण्यासाठी दबाबतंत्र सुरु असल्याचे येथे तणावाचे वातावरण आहे.
उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास राजीनामे देण्याची कार्यकर्त्यांनी धमकी दिली आहे. शिवसेना पदाधिकारी प्रभाग 22मध्ये शिवसेनेत अंतर्गतवाद वाढला आहे.
पालक मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नगरसेविका पूजा गणेश वाघ यांच्या समर्थकांनी हा पवन कदम यांना घेराव घातला आहे. पवन कदम यांच्या पत्नी पल्लवी पवन कदम याना प्रभाग क्रमांक २२ मधून शिवसेनेने तिकीट दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आता काय भूमिका बजावतात, याकडे लक्ष लागले आहे. अधिकृत उमेदवारीवर दबाव आणण्याचा शिंदे यांचा छुपा पाठिंबा नाही ना, अशी चर्चा रंगत आहे.