अश्लील चाळे : मुख्याध्यापक बालाजी मुंडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या मुख्याध्यापकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुख्याध्यापक बालाजी मुंडे हा विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
परभणीती : शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या मुख्याध्यापकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुख्याध्यापक बालाजी मुंडे हा विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
परभणीतील बालक आश्रमात राहणा-या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला बालक आश्रमातून हाकलून देण्याची घटना ताजी असतांनाच परभणीच्या सोनपेठ तालुक्यातही शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. मुख्याध्यापक बालाजी मुंडे गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता.
अखेर विद्यार्थिनींनीच पालकांकडे बालाजी मुंडेची तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पालकांनी पुढाकार घेऊन मुख्याध्यापक बालाजी मुंडेच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश केला. मात्र मुंडेनं आत्महत्येची धमकी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
गावकऱ्यांनी त्याच्या धमक्यांना भीक न घालता सोनपेठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुली शिकल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असतांना अशा घृणास्पद प्रकारामुळं मुलींच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती आहे. दरम्यान बालाजी मुंडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.