पुणे : 'ढोल ताशे' सिनेमाचा दिग्दर्शक अतुल तापकीरच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी प्रियांका तापकीर हिच्यासह चौघांना अटक करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्येपूर्वी अतुल यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या पत्नीनं आपला छळवाद मांडल्याचं आणि त्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. या प्रकरणात तापकीर यांची पत्नी प्रियांका यांनी एका खाजगी चॅनलशी बोलताना आपली बाजू मांडलीय. 


'अतुल यांनी आपला छळवाद मांडला होता... घरात सतत भांडणं व्हायची, ते मारहाणही करायचे पण तरीही त्रास कमी झाला नाही.. मलाच आत्महत्येचा विचार आला होता... पण दोन मुलांकडे पाहून मी हा विचार मागे टाकला... आणि कष्ट करून चार वर्ष घर सांभाळलं' असा दावा प्रियांका यांनी केलाय.  


'अतुल यांनी ढोल ताशे हा सिनेमा काढण्यासाठी कर्जाचा डोंगर उभा केला होता... त्यामुळे खूप कर्जही झालं होतं... त्यांनी अनेकांकडून कर्ज घेतलं होतं... कर्जदार घरी येऊन माझ्याकडे पैशांची मागणी करायचे... त्यांचं टेन्शन कमी करण्यासाठी मी माझे दागिनेही दिले होते... आमचे सहा फ्लॅट होते... ते विकून कर्जदारांचे पैसे चुकवण्याचा सल्लाही मी त्यांना दिला होता' असं प्रियांका यांनी म्हटलंय. 


नशेतद अतुल रोजच मारहाण करायचे... बायको-मुलांची काळजी नव्हती... बाई आणि पैशांचा नाद लागला होता... अतुल यांच्या वडिलांनीही त्यांना चुकीच्या गोष्टींसाठी साथ दिली... पैसे नव्हते.. तरी ते गोवा, बालाजी फिरत होते... असा आरोपही प्रियांका यांनी यावेळी केलाय. त्यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतरच आपण वेगळं राहायला सुरुवात केली होती, असंही त्यांनी म्हटलंय. 


अतुल तापकीर यांनी महिन्याला खर्चाला प्रियांकाला पैसे दिल्याचा दावा केला होता. त्यावर, केवळ दोन महिनेच त्यांनी आपल्याला पैसे दिले... त्यांनी मुलांची फीदेखील दिली नव्हती... तेव्हा माझ्या भावांनी मदत म्हणून पैसे दिल्याचंही त्यांनी म्हटलंय.