लातूर : एका रेल्वेसाठी एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळी आंदोलन होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना लातूर जिल्ह्यात होते आहे.


मुंबई-लातूर एक्सप्रेसचे कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातील लातूर आणि उदगीरमध्ये आंदोलनं सुरु आहेत. या रेल्वे विस्तारीकरणामुळे या मार्गावरील उदगीरच्या नागरिकांची मुंबईला जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे. त्यामुळे हे मुंबई-बिदर विस्तारीकरण कायम ठेवून ही गाडी दररोज सुरु करावी अशी उदगीरकरांची मागणी आहे. या मागणीसाठी उदगीर बंदची हाक देण्यात आलीय. ज्याला उदगीरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्वच व्यापा-यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला.