पुणे : सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिरात आज दसऱ्याच्या मुहूर्तावर महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवण्यात आलीय.  तब्बल १४ किलो वजनाची ही सोन्याची साडी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सात वर्षांपासून अशी सोन्याची साडी महालक्ष्मीला नेसवली जाते. 


महालक्ष्मीचं हे रुप पाहण्यासाठी दरवर्षी दस-याला पुणेकरांची मोठी गर्दी होते. 33 वर्ष जुनं हे महालक्ष्मीचं  मंदिर आहे.


नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. आज दस-याच्या निमित्तानं मंदिरात लाखो फुलांची आरास करण्यात आलीय.